काशी विश्वेश्वर मंदिरात बेल रोपांचा मिळणार प्रसाद

belpatra
जगप्रसिद्ध काशी विश्वेश्वर मंदिर प्रशासनाने पर्यावरण संरक्षणासाठी आगळी प्रथा सुरू करण्याचा निर्णय घेतला असून येथे दर सोमवारी दर्शनासाठी येणार्‍या भाविकांना बेलाचे रोप प्रसाद म्हणून दिले जाणार आहे. त्यासाठी भाविकांकडून ११ रूपये घेतले जातील असे समजते.

बेल वृक्षाचे संरक्षण व्हावे व लोकांना त्याचे महत्त्व कळावे यासाठी हा उपक्रम हाती घेण्यात आला आहे. प्रशासनातील व्यक्तीकडून मिळालेल्या माहितीनुसार शंकराला बेल फार प्रिय आहे. जगभरातील शिवमंदिरात शंकराला बेल वाहिला जातो. त्याचबरोबर तो अत्यंत औषधीही आहे. जगात बेल वृक्षंाची संख्या फारच कमी आहे त्यामुळे बेल पानेही पुरेशी उपलब्ध होत नाहीत. त्यामुळे बेलाच्या संरक्षणाची गरज निर्माण झाली आहे. बेलाचे खोड, पाने व फळे आयुर्वेदिक औषधांत वापरली जातात म्हणूनही या वृक्ष महत्त्वाचा आहे. यामुळे बेल रोपे देऊन ही झाडे वाढविण्याचा तसेच पर्यावरण रक्षणाचा प्रयत्न केला जाणार आहे.

Leave a Comment