हायवेवरून जातो हा रनवे

runve
जगभरात अनेक ठिकाणी चित्रविचित्र एअरपोर्ट रनवे बांधले गेले आहेत. हे रनवे पाहिले की एखादी छोटीसी चूकही जिवावर बेतू शकते याची खात्रीच पटते. हाँगकाँगमधील रनवे असाच समुद्रात आत घुसलेला आहे व पायलटची जराशीही चूक झाली तर विमान सरळ समुद्रातच जाते. जर्मनीतील स्क्वादिन एअरपोर्टचा रनवेही असाच अफलातून आहे. यां रनवेचा कांही भाग पुलावरून आहे. आणि या पुलाखालून हायवे जातो.

लिपजिग व हाल्ले या शहरांसाठी हा एअरपोर्ट अतिशय महत्त्वाचा आहे. त्यामुळे तो लिपजिग हाल्ले अशा नावानेच ओळखला जातो. साडेतीन किलोमीटर लांबीचा हा रनवे ३ ब्रिजवरून जातो. महामार्गावरील वाहतूक विस्कळीत होऊ नये व विमानाचे लँडींग करतानाही या वाहतूकीवर कोणताही परिणाम होऊ नये म्हणून पुलांचा वापर केला गेला आहे. त्यामुळे खालून जाणारी वाहने आणि पुलावरून लँड होणारे विमान हे येथील नेहमीचे दृष्य झाले आहे.