केवळ कोट्याधीशांसाठीचे वधूवर सूचक मंडळ

lara
योग्य वधू अथवा वरांच्या निवडीसाठी वधूवर सूचक मंडळाचे सहाय्य घेण्याची प्रथा फक्त भारतातच नाही तर जगात अनेक ठिकाणी आहे. त्यात विशिष्ट जाती, धर्म यांची वेगळी मंडळेही असतात. ब्रिटनमधील लारा एस्प्रे ही महिलाही असेच वधूवर सूचक मंडळ चालविते मात्र ती ही सेवा कोट्याधीश व अब्जाधीशांसाठी देते आणि त्यातून लाखो डॉलर्सची कमाईही करते. त्यातही विशेष असे ही लाराचे बहुतेक सदस्य ५० वर्षांपुढचे आहेत. ती केवळ योग्य जोडीदारच शोधून देते असे नाही तर डेटसाठी वर वधूंना खास टिप्स देऊन तयारही करते. विशेष म्हणजे जगभरात लाराच्या या वधूवर सूचक मंडळाचे सदस्य पसरलेले आहेत.

३३ वर्षीय लारा सांगते अनेक कोटयाधीशांची आपल्या जोडीदाराविषयीची निवड वेगळी असते. त्यानुसार ती मॅचममेकींग करते. सहा महिन्याच्या सेवेसाठी ती १० लाख डॉलर्स फी आकारते. अर्थात एखाद्याला इतका पैसा खर्चायला नसेल तर तीही वेस्ट लंडनमध्ये वधूवर मेळावे आयेाजित करते व त्यात ३५ पौंड भरून इच्छुक सामील होऊ शकतात. लाराकडे १९ ते ७५ या वयोगटातील २ हजार स्थळांची माहिती आहे त्यातही एक खास यादी आहे. त्यात केवळ ४० ते ५० वयोगटातील कोट्याधीश व अब्जाधीशांचा समावेश आहे. चांगला जोडीदार मिळविण्यासाठी या लोकांची पाण्यासारखा पैसा खर्च करायची तयारी असते अससे समजते.

लाराच्या या खास यादीत बँकर्स, उद्योजक, हेज फंड मॅनेजर, सीईओ व प्रतिष्ठीत सिव्हील सर्व्हंटस आहेत. लारा सोबत एक छोटी काळी वही बाळगते त्यात वधूवरांची माहिती असते. कांही जण डेटिंगसाठी प्रशिक्षण घेतात व त्यासाठी लारा त्यांच्या घरी जाऊन त्यांना डेटसाठी कसे तयार व्हावे याचे शिक्षण देते. दुसर्‍या देशातील ही बडी गिर्हाीईके लारासाठी स्पेशल जेटची व्यवस्थाही करतात.

लारा सांगते इच्छुक श्रीमंत वरांच्या जोडीदारांविषयीच्या अपेक्षाही वेगळ्या असतात. कांही जणांना जगभर फिरताना मदत होऊ शकेल अशी अनेक भाषा जाणणारी जोडीदार हवी असते तर कांही जणांना आर्ट, योगा जाणणारी जोडीदार हवी असते. कांही जणांची अपेक्षा सुस्वभावी व बुद्धीमान जोडीदाराची असते. लाराच्या या महागड्या वधूवर सूचक मंडळाचा सक्सेस रेट किती हे मात्र समजू शकलेले नाही.

Leave a Comment