बंदी असूनही चिनी महिला ट्विटरची एमडी

twitter
सॅन फ्रान्सिस्को : ‘ट्विटर’ वर चीनमध्ये बंदी असतानाही कंपनी एका चीनी महिलेची व्यवस्थापकीय संचालक (एमडी) म्हणून नियुक्ती केली आहे. या महिलेचे कॅथी चेन असे नाव आहे. चीनमध्ये व्यवसायाची कोणतीही संधी कंपनी सोडण्यास तयार नसल्याचे आता स्पष्ट झाले आहे.

याबाबत ‘ट्विटर’ ने दिलेली माहितीनुसार, कॅथी चेन या पीपुल्स लिबरेशन आर्मीत इंजिनियर पदावर काम करत होत्या. कॅथी यांना चायनीज टेक इंडस्ट्रीत तब्बल २० वर्षांचा अनुभव आहे. दुसरीकडे, कॅथी यांची नियुक्त केल्यामुळे ‘ट्विटर’ वर टिकेची झोडही उठली आहे. चायनीज गव्हर्नमेंटने पीपुल्स लिबरेशन आर्मीत कॅथी चेनची १९८० च्या दशकात ज्यूनियर इंजिनियर पदावर नियुक्ती केली होती. तिने ही नोकरी १९९४ मध्ये सोडली. नंतर तिने चीनमध्ये जॉर्इंट वेंचर असलेल्या एका अमेरिकन कंपनीत कॉम्प्यूटर असोसिएट्स म्हणून काम केले.कॅथी चॅनकडे कंपनीने चीनसह हॉंगकॉंग, मकाऊ व तैवानच्या या विभागाची जबाबदारी सोपवली आहे.

चीनमध्‍ये ‘ट्विटर’ साठी जाहिरातदार आणि व्यावसायिक भागिदार शोधण्‍याचे काम कॅथी करणार आहे. चीनमध्ये बंदी असतानाही मागील काही वर्षात जाहिरातदारांच्या संख्‍येत ३०० पटीने वाढ झाली आहे. चीनमध्‍ये ट्विटरवर बंदी असूनही एका चिनी महिलेला या मायक्रो ब्लॉगिंग वेबसाइटचे एमडी बनवले जाते आणि तिची चिनी आर्मीशी असलेल्या संबंधावरुन सोशल मीडियावर प्रश्‍न उपस्थित केले जात आहे.

Leave a Comment