जेएनयू ‘गुगल मॅप’वर ठरले ‘अँटी नॅशनल’!

jnu
नवी दिल्ली – आज ‘anti national‘, ‘sedition‘ किंवा ‘leftist‘ असा ‘गुगल मॅप‘ वर शोध घेण्याचा प्रयत्न केला तर जवाहरलाल नेहरू विद्यापीठ (जेएनयू) दर्शविण्यात येत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.

‘गुगल‘ची संपूर्ण जगाचा नकाशा आणि त्यातील प्रमुख रस्ते, ठिकाणे इत्यादी माहिती दाखविणारी ‘गुगल मॅप‘ ही सेवा आहे. जगभरातील कोणत्याही स्थळाचे नाव टाईप केल्यावर ते ठिकाण गुगल मॅपवर दाखविण्यात येते. मात्र आज शोध घेताना ‘anti national‘, ‘sedition‘ किंवा ‘leftist‘ असा शब्द टाईप केला तर जवाहरलाल नेहरू विद्यापीठ दर्शविण्यात येत आहे. हा प्रकार चुकून झाले आहे की हॅकरने केले आहे, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.

हा प्रकार समोर आल्यानंतर नेटिझन्स या विषयावर चर्चा करत असून ट्‌विटरवर टॉप ट्रेण्डमध्ये “गुगल मॅप‘ आढळून येत आहे. नेटिझन्सकडून यावर संमिश्र प्रतिक्रिया व्यक्त करण्यात येत आहेत.

Leave a Comment