स्टार्टअपसाठी ‘एचडीएफसी’कडून ‘स्मार्टअप’

hdfc-bank
पुणे – स्टार्टअपच्या सगळ्य़ा बँकिंगविषयक गरजा पूर्ण करण्यासाठी एचडीएफसी बँकेने ‘स्मार्टअप’ ही सुविधा सुरू केली आहे. याद्वारे बँकिंग व पेमेंट सुविधेसह सल्ला आणि परकीय चलन सुविधाही दिली जाणार आहे. स्टार्टअप हब म्हणून उदयास येणा-या टियर २ आणि ३ श्रेणीतील शहरांध्ये ही सुविधा उपलब्ध असणार आहेत. प्रामुख्याने सुरुवातीच्या टप्प्यामध्ये नवउद्योजकांना प्रोत्साहन आणि चालना देण्यासाठी विशेष ही सेवा सुरू करण्यात आली आहे. ही सेवा झोन स्मार्टअप इंडिया (झेडएसआय) च्या संयुक्त विद्यमाने सुरू करण्यात आली असल्याचे बँकेच्या अधिका-यांनी माहिती देताना सांगितले.

Leave a Comment