
भारतीय स्मार्टफोन उत्पादक कंपनी इंटेक्सने स्वस्तातला मस्त असा क्लाऊड सिरीजमधला थ्रीजी स्मार्टफोन ब्रीझ या नावाने सादर केला आहे. या फोनची किंमत ३९९९ रूपये आहे मात्र सध्या तो फक्त स्नॅपडीलवरच मिळू शकणार आहे. प्रथमच अँड्राईड फोन वापरणार्या युजरसाठी हा फोन अतिशय उपयुक्त ठरेल असा कंपनीचा दावा आहे.
इंटेक्सचा क्लाऊड सिरीजमधला नवा ब्रीझ स्मार्टफोन
या फोनसाठी ५ इंचाचा डिस्प्ले कॉर्निंग गोरिला थ्री ग्लास प्रोटेक्शनसह दिला गेला आहे. १ जीबी रॅम, ८ जीबी इंटरनल मेमरी ती कार्डच्या सहाय्याने ३२ जीबी पर्यंत वाढविण्याची सुविधा, ५ एमपी चा एलईडी फ्लॅशसह रियर कॅमेरा, २ एमपीचा व्हिडीओ कॉलिंग करता येईल असा फ्रंट कॅमेरा, अँड्राईड ४.४ किटकॅट ओएस, अशी त्याची अन्य फिचर्स आहेत. थ्रीजी बरोबरच त्याला वायफाय, ब्ल्यू टूथ, जीपीएस अशी अन्य कनेक्टिव्हीटी ऑप्शन्सही दिली गेली आहेत.
