तीरासारखी सुसाट अपोलोची अॅरो रेसिंग कार

arrow
बाणासारखी सुसाट धावणारी अॅरो ही रेसिंग कार अपोलो कंपनीने जिनिव्हा मोटर शो मध्ये सादर केली आहे. हाय क्वालिटी स्टील ट्यूबची फ्रेम असलेल्या या कारमध्ये कार्बन, अल्युमिनियम यांचाही वापर केला गेला आहे.

या कारला ४.० लिटरचे टर्बो ट्विन व्ही ८ इंजिन दिले गेले आहे. फुल्ली सिक्रोनाईज्ड सिकशेंशन सेव्हन गिअर सीआयएमएम ट्रान्समिशनशी ते जोडले गेले आहे. ही दोन सीटर कार ० ते १०० किमीचा वेग २.९ सेकंदात घेते आणि तिचा टॉप स्पीड आहे ताशी ३६० किमी. या रेसिंग कारला ८५ लिटरचा स्टेनलेस स्टील टँक दिला गेला असून गाडीचे इंजिन दोन सीटच्या मध्ये आहे.

या कारला एअर जंकसह एअर लिफ्ट सिस्टीम दिली गेली आहे तसेच इलेक्ट्रोनिक पार्किंग ब्रेक व इलेक्ट्रिक पॉवर स्टीअरिन्गही आहे.

Leave a Comment