शाओमीचा ‘रेडमी नोट ३’ लाँच

xiaomi
मुंबई : आणखी एक भन्नाट स्मार्टफोन चायनीज कंपनी शाओमीने बाजारात आणला असून जबरदस्त फीचर्समुळे शाओमीचा ‘रेडमी नोट ३’ हा फोन अनेक मोठ्या कंपन्यांना टक्कर देईल, अशी आशा कंपनीला आहे. ‘रेडमी नोट ३’ या फोनची किंमत ९,९९९ रुपये आहे. महत्त्वाचे म्हणजे शाओमीचा हा पहिला फिंगरप्रिंट सेंसरचा फोन आहे. या फोनचा फिंगरप्रिंट सेंसर इतका फास्ट आहे की तो अवघ्या ३ सेकंदात काम सुरु करतो. यापूर्वी शाओमीने त्यांचा सर्वात महागडा फोन mi५ मध्येही फिंगरप्रिंट सेंसर दिला नव्हता. तो ‘रेडमी नोट ३’ या फोनमध्ये दिला आहे. या फोनच्या ३जीबी रॅम असलेल्या मॉडेलची किंमत ११,९९९ रुपये आहे.

‘रेडमी नोट ३’ हा फोन ऑनलाईन शॉपिंग साईट्सवर उपलब्ध आहे. हा फोन खरेदी करण्यासाठी अमेझॉन आणि mi.com या वेबसाईट्सवर रजिस्टर करावे लागेल. या फोनची विक्री ९ मार्चपासून सुरु होईल.