ग्राहकांची ४२ जाहिरातींनी केली फसवणूक

asc
मुंबई : डिसेंबर महिन्यात एकूण ७९ जाहिरातींपैकी ४२ जाहिरातींकडून ग्राहकांची फसवणूक झाल्याची तक्रारी अॅडव्हर्टायजिंग स्टँडर्ड काऊन्सिल ऑफ इंडियाने योग्य ठरविल्या असून यात स्नॅपडील, ओएलएक्स, ऊबर, भारती एअरटेल, कोलगेट इत्यादी उत्पादनांच्या जाहिरातींचा समावेश आहे. अॅडव्हर्टायजिंग स्टँडर्ड काऊन्सिल ऑफ इंडियाच्या मते यात ग्राहकांनी केलेल्या तक्रारींनुसार या ४२ जाहिरातींपैकी आठ जाहिराती आरोग्याविषयी, नऊ शैक्षणिक विषयांसंबंधी, व्यापारासंबंधी सात तर दूरसंचार क्षेत्रासंबंधी १५ जाहिरातींचा समावेश आहे. यात आता या संस्थेने या जाहिरातींविरुद्ध गुन्हे दाखल केले असून त्यांच्यावर पुढील कारवाई केली जाणार आहे.

Leave a Comment