जगातील सर्वात महागडे रेल्वे स्टेशन जनतेसाठी खुले

railway-station
न्यूयॉर्क : न्यूयॉर्कमधील वर्ल्ड ट्रेड सेंटर १४ वर्षांपूर्वी ९/११ च्या हल्ल्यात नष्ट झाले होते. आता या जागेवर भव्य रेल्वे स्टेशन उभारण्यात आले असून हे जगातील सर्वात महागडे रेल्वे स्टेशन आहे. हे स्टेशन आता जनतेसाठी खुले होत आहे. हे रेल्वे केंद्र न्यूजर्सी आणि न्यूयॉर्क सब वे लाईनला जोडणारे आहे. या रेल्वे स्टेशनमध्ये दुकाने आणि रेस्टॉरंटही आहे. स्पॅनिश-स्वीस वास्तुकार सेंटियागो कालात्रावाने या इमारतीला डिझाईन केले आहे. अंडाकार इमारतीसाठी स्टीलचा मोठ्या प्रमाणात उपयोग करण्यात आला आहे. काचेच्या फ्रेम लक्ष वेधून घेतात. जवळपास १२ वर्षांचा कालावधी हे स्टेशन उभारण्यासाठी लागला. या रेल्वेस्थानकासाठी ३५० कोटींपेक्षा अधिक रक्कम खर्च झाली आहे. पक्ष्याच्या पंखाचा आभास निर्माण करणारी ही कलाकृती डोळे दिपवणारी आहे.

Leave a Comment