
रिलायन्स जिओने दोन नवे बजेट फोर जी स्मार्टफोन बाजारात आणले आहेत. त्यांच्या किमती ७ हजारांपेक्षाही कमी आहेत आणि फिचर्सच्या दृष्टीने हे फोन चांगल्या दर्जाचे असल्याचा कंपनीचा दावा आहे. एलवायएफ विंड सिक्स आणि एलवायएफ फ्लेम वन या नावाने हे फोन आले आहेत.
रिलायन्सचे बजेट फोर जी स्मार्टफोन सादर
विंड सिक्ससाठी ५ इंचाचा तर फ्लेम वन साठी ४.५ इंचाचा आयपीएस डिस्प्ले दिला गेला आहे. दोन्ही स्क्रीन मल्टीटच फंक्शनसह आहेत. त्याचबरोबर अन्य फिचर्समध्ये ५ एमपीचे रियर व फ्रंट कॅमेरे, अँड्राईड लॉलिपॉप ५.१ ओएस, १ जीबी रॅम, ८ जीबी इंटरनल स्टोरेज, कार्डच्या सहाय्याने ३२ जीबी पर्यंत वाढविण्याची सुविधा यांचा समावेश आहे. विंड सिक्स काळा, पांढरा व गोल्ड कलरमध्ये तर फ्लेम वन काळा, पांढरा, गडद निळा व गडद लाल रगात उपलब्ध आहेत.
