दिल्ली मेट्रो कार्गोसेवा देणार

metro
दिल्ली मेट्रो कार्पोरेशनने एअरपोर्ट एक्स्प्रेस लाईनवर कार्गो सेवा देण्याचा निर्णय घेतला असून ही सेवा प्रायोगिक पातळीवर १ मार्चपासून सुरू होत आहे. तीन महिने ही सेवा सुरवातीला दिली जाणार असून त्यानंतर ती कायम करण्याबाबतचा निर्णय घेतला जाणार असल्याचे समजते. यासाठी दिल्ली मेट्रोने विशेष कार्गो एजन्सीबरोबर करार केला आहे.

ही सेवा प्रामुख्याने ई कॉमर्स आयटम्स वाहून नेण्यासाठी वापरली जाणार आहे. त्यातून इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळापर्यंत सामान नेले जाणार आहे. यातून नेल्या जाणार्‍या सामानाची सुरक्षेच्या दृष्टीने पूर्ण पाहणी केल्यानंतरच ते मेट्रोत चढविले जाणार असल्याचे सांगितले जात आहे. भारतात मेट्रो कार्गो सेवेचा हा पहिलाच प्रयत्न आहे.

Leave a Comment