मिनी फेरारी अल्फा रोमिओ फोर सी स्पायडर २०१६

romeo
स्पोर्टस कार म्हटले की आपल्यानजरेसमोर तरळू लागतात फेरारी आणि पोर्शेच्या कार्स. मात्र या यादीत आणखीही एक कंपनी सामील असून तिनेही कारशौकीनांच्या हृदयावर आपला ठसा खोल उमटवला आहे. शौकिनांच्या लाडक्या कारचे नाव आहे अल्फा रोमियो फोर सी स्पायडर. परफॉर्मन्समध्ये उत्कृष्ठ असलेली ही कार दिसायलाही लाखात एक अशी देखणी आहे. मिनी फेरारी अशीही तिची ओळख आहे.

या कारला १.७५ लिटर टर्बोचार्ज्ड इनलाईन ४ इंजिन, अल्फा सीटीसी ६ स्पीड आटोमॅटिक ट्रान्समिशनसह दिले गेले आहे. ० ते १०० किमीचा वेग ती ४.२ सेकंदात पकडते आणि तिचा टॉप स्पीड आहे ताशी २५७ किमी. प्रवासी सुरक्षेसाठी तिला पाच एअरबॅग्ज दिल्या गेल्या आहेत. मनोरंजनाच्या दृष्टीनेही तिच्यात भरपूर सामग्री आहे. सात इंची फुलकलर टीएफटी डिस्प्ले, सीडी, एमपीथ्री रेडिओ, ब्ल्यू टूथ, यूएसबी पोर्ट, आयपॉड इंटरफेस दिले गेले आहेत. कारचे सस्पेन्शन उत्तम दर्जाचे आहे व त्यामुळे दीर्घ प्रवासाचा शीणही प्रवाशांना जाणवणार नाही असा कंपनीचा दावा आहे. हॅलजन हेडलँप मुळे तिच्या सौंदर्यात भरच पडली आहे. ही कार अमेरिकेत ४५ लाख रूपयांत विकली जाणार आहे. भारतात ती कधी येणार याचा कोणताही खुलासा केला गेलेला नाही.

Leave a Comment