पँटच्या खिशातील मोबाईलमुळे पौरुषत्वावर विपरीत परिणाम;

mobile
लंडन : आजच्या काळातील सर्वांची एक गरज आहे टी म्हणजे मोबाईल, जर तुम्ही तुमचा मोबाईल पँटच्या खिशात ठेवत असाल तर सावधान ! कारण मोबाईल पँटच्या खिशात घेऊन फिरणे तुमच्या पौरुषत्वावर विपरीत परिणाम करू शकते. एक्स्टर विद्यापीठाच्या एका संशोधनातून ही माहिती समोर आली आहे.

मोबाईल फोन बाळगणे एकेकाळी स्टेटस सिम्बॉल होता, पण आता ती काळानुरूप गरज बनली आहे. पण नवनव्या संशोधनांनुसार मोबाईल फोन वापराचे काही धोकेही पुढे येऊ लागले आहेत. असाच एक धोका आता तुम्ही मोबाईल कुठे ठेवता यावरूनही समोर आला आहे. तुम्ही जर पँटच्या खिशात तुमचा मोबाईल ठेवत असाल तर, तुमच्यासाठी धोक्याचा इशारा आहे. मोबाईल फोनचा वाढता वापर आणि त्यामुळे होणा-या दुष्परिणामासंबंधी जगभरात सातत्याने संशोधन सुरू आहे. पँटच्या खिशात मोबाईल फोन ठेवणा-या पुरुषांमधील पौरुषत्वावर विपरीत परिणाम होऊ शकतो, असे एका नव्या संशोधनातून समोर आले आहे.

फोनमधील किरणत्सोर्गामुळे वि-याच्या दर्जावर परिणाम होऊ शकतो, असा निष्कर्ष या संशोधनातून काढण्यात आला आहे. एक्सटर विद्यापीठातील शास्त्रज्ञांनी केलेल्या एका पाहणीत, इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडियशनमुळे वि-याची गती ८ टक्क्यांनी कमी झाल्याचे आढळून आले आहे. शास्त्रज्ञांच्या टीमने १४९२ पुरुषांचा सहभाग असलेल्या दहा अभ्यासांच्या पाहणीचे पुनर्परिक्षण केले. मात्र फर्टिलिटी क्षेत्रातील तज्ज्ञाने या अभ्यासातील निरीक्षणाशी असहमती दर्शवत आपण आपला आयफोन पँटच्या खिशातच ठेवणार असल्याचे म्हटले आहे. पुरुषाच्या पौरुषत्वावर मोबाईल फोनचा लक्षणीय प्रभाव पडतो असे शास्त्रज्ञांचे मत आहे.

पँटच्या खिशात मोबाईल फोन बाळगणा-यांना किरणोत्सर्गाचा धोका संभवतो आणि त्यामुळे अशा मोबाईलधारकाची पिता होण्याची शक्यता कमी होते. जगभरातील बहुतांश व्यक्ती मोबाईल फोनचा वापर करतात आणि श्रीमंत देशातील जवळपास १४ टक्के जोडप्यांना वंध्यत्वाचा सामना करावा लागतो. एक्सटर विद्यापीठातील डॉ. फिओना मॅथ्यूज यांच्या नेतृत्वाखालील एका टीमने १४९२ पुरुषांचा सहभाग असलेल्या दहा अभ्यासांचे पुनर्वालोकन केले. तसेच जे पुरुष आपले पौरुषत्व गमावण्याच्या पातळीला पोहचले आहेत, त्यांना अधिक धोका संभवतो असेही आढळून आले आहे. अर्थात या निष्कर्षांना पुष्टी देण्यासाठी अधिक संशोधनाची आवश्यकताही डॉ.मॅथ्यूज यांनी बोलावून दाखवली आहे.