भारतात वाढत आहे धूम्रपान करणाऱ्यांची संख्या

smoking
नवी दिल्ली – भारतात धुम्रपानाचे व्यसन सोडण्याचे तमाम प्रकार निष्फळ ठरत आहे. एका ताज्या सर्वेक्षणानुसार १८ व्या वर्षात धूम्रपान करणाऱ्या पुरुषांच्या संख्येत ३६ टक्क्यांनी वाढ झाली आहे. भारतात धुम्रपान करणाऱ्यांची संख्या १०.८० कोटींच्या घरात पोहचली आहे. याबाबतीत भारत चीनच्या मागोमाग आहे.

टॉरेंटो युनिव्हर्सिटीमधील भारतीय वंशाच्या प्रभात झा यांनी आपल्या सर्वेक्षणात याचा खुलासा केला आहे. हे सर्वेक्षण १९९८ ते २०१५च्या दरम्यान केले गेले. या संशोधनात १५ ते ६९ वयोगटातील लोकांचा समावेश केला गेला. देशात सतरावर्षापूर्वी धुम्रपान करणाऱ्या पुरुषांची संख्या ७.९ कोटींच्या घरात होती. ज्यात २.९ कोटीची वाढ झाली आहे. देशात धुम्रपान करणाऱ्या महिलांची संख्या १.१ कोटी आहे.

याबाबत अधिक माहिती देताना प्रभातने वर्ष २०१०मध्ये धुम्रपानामुळे दहा लाख लोकांचा बळी गेला होता. ज्यात ७० टक्के लोक ३० ते ६९ वयोगटातील होते.

Disclaimer: आरोग्य विषयक लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक स्वरुपाची आहे. हि माहिती वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय होऊ शकत नाही  या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टर अथवा वैद्यकीय तज्ञाकडून खात्री करून घ्यावी. या माहितीची जवाबदारी माझा पेपर घेत नाही

Leave a Comment