अवकाशसंस्थांनी पूर्ण करावे कल्पना चावलाचे स्वप्न – सुनीता

sunita
नवी दिल्ली – नासाच्या भारतीय वंशाच्या महिला अवकाशप्रवासी सुनीता विल्यम्स यांनी दिवंगत अवकाशयात्री कल्पना चावला हिचे तरुणांना विश्वाचा धांडोळा घेण्याची संधी देण्याचे स्वप्न अवकाश संस्थांनी साकार करावे, असे मत व्यक्त केले. आपल्या ज्ञानाच्या कक्षा अवकाशातील वास्तव्यानंतर रूंदावल्या व त्यानंतर अनेकदा विद्यार्थ्यांशी संवादाची संधी मिळाली असे सांगून त्या म्हणाल्या की, तुम्हाला जे करावेसे वाटते ते करण्याची संधी मिळणे महत्त्वाचे असते. ऑब्झर्वर रीसर्च फाउंडेशनच्या कल्पना चावला वार्षिक अवकाश संवादात त्या बोलत होत्या.

नासाने अवकाश सहकार्यासाठी पाठवलेल्या शिष्टमंडळात सुनीता विल्यम्स यांचा सहभाग आहे. तरूण मुलांना अवकाश संशोधनाच्या माध्यमातून विश्वाचे गूढ उकलण्याची संधी देणे हाच कल्पना चावलाचे स्वप्न पूर्ण करण्याचा खरा मार्ग आहे. आता अवकाश कार्यक्रमात नासा व्यावसायिक कंपन्यांची मदत घेत आहे. पृथ्वी निकटच्या कक्षेत जाण्यासाठी या कंपन्या अवकाशयाने तयार करीत आहेत. जगातील इतर लोकांनाही यातून अवकाश प्रवासाची संधी मिळू शकते. मुलांप्रती आपली मोठी जबाबदारी आहे. कल्पना चावलाचे वडील बी.एल.चावला यांनी कल्पनाच्या आठवणी सांगितल्या.

कल्पनाचा २००२ मध्ये झालेल्या अवकाश दुर्घटनेत मृत्यू झाला होता ती नासात संशोधक होती. तिने अवकाश प्रवासही केला होता. आपले नाते विश्वाशी आहे एका देशाशी नाही असे ती मानत होती. कल्पना एकदा कामावरून उशिरा आली तेव्हा तू इतका वेळ काय करीत होतीस, असे विचारले असता फाटलेले बूट शिवून आणायला गेले होते असे तिने सांगितले. नवे बूट असताना फाटके बूट कशाला शिवायला गेली होतीस असे विचारले असता त्यातून एका प्राण्याचे जीवन वाचले व एका माणसाला रोजगार मिळाला असे उत्तर तिने दिले होते.

Leave a Comment