
लंडन – ऑस्ट्रियाची राजधानी व्हिएन्ना शहर वास्तव्यासाठी जगातील सर्वोत्तम ठिकाण म्हणून असल्याचे एका सर्वेक्षणातून समोर आले आहे. व्हिएन्ना राहण्यासाठी जगातील सर्वोत्तम ठिकाण १८ व्या मरसर क्वालिटी ऑफ लाईफच्या आंतरराष्ट्रीय सर्वेक्षणानुसार आहे.
ऑस्ट्रियाची राजधानी वास्तव्यासाठी जगातील सर्वोत्तम शहर
या सर्वेक्षणानुसार, झ्युरिच, ऑकलंड, म्युनिच आणि व्हॅनकोवर या शहरांचा व्हिएन्ना खालोखाल नंबर लागतो. मात्र लंडन, पॅरिस, न्यूयॉर्क या जगप्रसिद्ध शहरांना पहिल्या तीसमध्येही स्थान मिळवता आलेले नाही. खेदाची बाब म्हणजे या यादीतील पहिल्या शंभर शहरांमध्ये भारतातील एकाही शहराला स्थान मिळालेले नाही. २३० जागतिक शहरांमधील सामाजिक आणि आर्थिक स्तराबरोबर आरोग्य, शिक्षण आणि निवासव्यवस्था आणि पर्यावरण याचा अभ्यास केल्यानंतर हा निष्कर्ष काढण्यात आला आहे. दरम्यान, या सर्वेक्षणामध्ये इराकमधील बगदाद शहराची जगातील सर्वात वाईट शहर म्हणून नोंद करण्यात आली आहे.
