सायन्स एक्स्प्रेस – रेल्वेची खास गाडी

sciencee
वातावरणातील बदलांमुळे जागतिक तापमानवाढीच्या संकटाचा सामना करावा लागत असताना भारतीयांमध्ये या संदर्भात जागृती करण्यासाठी इंडियन रेल्वेने १६ डब्यांची खास वातानुकुलीत गाडी सायन्स एक्स्प्रेस नावाने सुरू केली आहे. १५ आक्टोबर २०१५ साली रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांच्या हस्ते दिल्लीच्या सफदरजंग स्टेशनवरून तिला हिरवा कंदील दाखविला गेला व ही रेल्वे २० राज्यांतून प्रवास करून ७ मे २०१६ ला गुजराथेतील गांधीनगर येथे पोहोचणार आहे.

या रेल्वेचे पूर्ण नांव आहे सायन्स एक्स्प्रेस क्लायमेट अॅक्शन स्पेशल. आत्तापर्यंत तिने राजस्थान, पंजाब, उत्तराखंड, हरियाणा, उत्तर प्रदेश, मध्यप्रदेश, आसाम, प.बंगाल, छत्तीसगढ, आंध्रतून प्रवास केला असून सध्या ती तेलंगाणातील जहीराबाद येथे पोहोचलेली आहे. या रेल्वेतील बोगींमध्ये आसने नाहीत तर त्याऐवजी तापमानवाढ म्हणजे काय, त्याचे परिणाम, त्यामुळे येऊ शकणारी संकटे व ही तापमान वाढ रोखण्यासाठी करावयाची उपाययोजना याची माहिती दिली गेली आहे. सर्व लोकांना हे प्रदर्शन पाहता येत असले तरी प्रामुख्याने शिक्षक व विद्यार्थी यांनी ते पाहावे असा उद्देश आहे.

Leave a Comment