स्पाइस जेटची ‘फ्लाय फॉर शुअर’ ऑफर

spicejet
नवी दिल्ली – आपल्या ग्राहकांसाठी ‘फ्लाय फॉर शुअर’ नावाची ऑफर स्पाइस जेट या विमान प्रवाशी वाहतूक कंपनीने आणली असून स्पाइस जेटच्या या ऑफरनुसार विमानाचे तिकिट आरक्षित केल्यास २९९ रुपयामध्ये २४ तासांच्या आत विमानातून नियोजित ठिकाणी पोहोचविण्याची गॉरंटी देण्यात आली आहे. मात्र या ऑफरबरोबर काही अटी लागू करण्यात आल्या आहेत.

९० मिनिटापेक्षा जास्त कालावधीने जर विमान उशिरा धावत असेल तर किंवा प्रवाशांचे विमान ३० मिनिटाच्या अंतराने चुकले असेल तर किंवा विमान कंपनीकडून विमान रद्द करण्यात आले तर ही ऑफर लागू करण्यात येणार आहे. या ऑफरचा लाभ घेण्यासाठी ग्राहक फक्त २९९ रुपये भरावे लागणार आहेत. ग्राहकांनी दुस-या कंपनीचे विमान अगोदर निवडल्यास त्यांना पैसे परत करण्यात येणार आहेत. मात्र त्यासाठी परत करण्यात येणारी रक्कम ही पहिल्या विमानाच्या तिकिटापेक्षा दुप्पटीपेक्ष कमी असली पाहिजे. सध्या ही ऑफर फक्त देशांतर्गत वाहतुकीसाठी आणि सात दिवसांपूर्वी तिकिट बुक करण्यात आले तरच लागू होणार आहे. याव्यतिरिक्त ग्राहकांना प्रवासाच्या सात दिवसाच्या आत परत मिळणाऱया रकमेचा दावा करावा लागणार आहे.

Leave a Comment