मानवी गर्भात जनुकीय बदल करण्यास ब्रिटीश सरकारची अनुमती

british
लंडन – ब्रिटीश सरकारने तेथील शास्त्रज्ञांना मानवी गर्भात जनुकीय बदल करण्यासाठी प्रयोग करण्यास अनुमती दिली आहे. नेहमीच हा मुद्दा वादग्रस्त राहिला असून अनेक देशांनी अशा संशोधनावर बंदी घातल्यामुळे ब्रिटीश सरकारचा हा निर्णय नव्या वादाला निमंत्रण देणारा ठरण्याची शक्यता आहे.

अनेक महिलांना गर्भपात किंवा वंध्यत्व या समस्यांना सामोरे जावे लागते. या समस्या सोडविण्यासाठी ही अनुमती देण्यात आली आहे, असे ब्रिटीश सरकारचे म्हणणे आहे. गर्भात जनुकीय बदल केल्यास गर्भपाताची शक्यता टाळता येते. तसेच वंध्यत्वावरही मात करता येऊ शकते, असे शास्त्रज्ञांचे प्रतिपादन आहे.

मानवी गर्भाच्या जनुकांवर संशोधन करून त्यात सुधारणा केल्यास गर्भाची वाढ आणि गर्भाची रचना यातील अनेक दोष टाळता येऊ शकतात. अपंगत्व, मूकबधीरपणा, रक्तदोष इत्यादी जन्मजात समस्यांवर सध्या उपलब्ध असणाऱया अत्याधुनिक वैद्यक शास्त्रातही खात्रीचे उपाय नाहीत. पण जनुकीय अभ्यासातून हे उपाय शोधण्याच्या दृष्टीने दिशा मिळू शकते, असे संशोधकांचा दावा आहे.

Disclaimer: आरोग्य विषयक लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक स्वरुपाची आहे. हि माहिती वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय होऊ शकत नाही  या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टर अथवा वैद्यकीय तज्ञाकडून खात्री करून घ्यावी. या माहितीची जवाबदारी माझा पेपर घेत नाही

Leave a Comment