आरबीआयने जाहीर केले आर्थिक वर्षातील शेवटचे पतधोरण

rajan
नवी दिल्ली- मंगळवारी चालू आर्थिक वर्षातील शेवटचे पतधोरण भारतीय रिझर्व्ह बँकेने (आरबीआय) जाहीर केले असून रेपो रेट आणि रिव्हर्स रेपो रेटमध्ये आरबीआयने कोणताही बदल केलेला नाही. परिणामी व्याजदरात कोणतेही बदल होणार नाही. आरबीआयने रेपो रेट ६.७५ टक्के आणि रिव्हर्स रेपो रेट ५.७५ टक्के कायम ठेवला आहे.

पतधोरण जाहीर करताना महागाई दरानुसार व्याजदरात कपात करण्याचा निर्णय घेण्यात येईल असे रिझर्व्ह बॅंकेचे गव्हर्नर रघुराज राजन यांनी सांगितले. यासोबतच येत्या २९ फेब्रुवारीला संसदेत सादर होणार्‍या अर्थसंकल्पावर देखील लक्ष राहणार असल्याचे राजन यांनी सांगितले. डिसेंबर २०१४मध्ये ठोक महागाई दर -०.७३ टक्के व रिटेल महागाई दर ५.५१ टक्के होता.

Leave a Comment