
टीम इंडियाच्या कसोटी संघाचा कर्णधार विराट कोहली आणि बॉलीवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा यांच्यातील लव्ह अफेयरर्सबाबतच्या अनेक गोष्टी तुम्ही ऐकल्या असतील. पण तुम्हाला हे माहीत आहे का? रियल लाईफमध्ये हे लव्ह बर्ड सोशल साइट इन्टाग्रामवर एकमेकांना फॉलोही करत नाही. हाच विषय सध्या त्यांच्या चाहत्यांमध्ये चर्चेचा विषय बनला आहे.
इन्स्टाग्रामवर विराट-अनुष्काने केले एकमेकांना अनफॉलो
खरंतर विराट आणि अनुष्का इन्स्टाग्रामवर एकमेकांना फॉलो करत नसल्याचे ट्विट त्यांच्या एका चाहत्याने केले होते. मग काय बघता बघता हे ट्विट अनेकांनी रिट्वीट केले तसेच अनुष्का आणि विराटकडून उत्तरही मागितले. मात्र अद्याप विराट अथवा अनुष्का या दोघांकडूनही कोणतेही उत्तर देण्यात आलेले नाही.
