जनरल मोटर्सची ‘शेव्हरोलेट क्रूझ’ बाजारपेठेत

chevrolet
नवी दिल्ली: जनरल मोटर्सची ‘शेव्हरोलेट क्रूझ २०१६’ ही नवी गाडी बाजारपेठेत दाखल झाली आहे. या गाडीची एक्स शोरूम किंमत १४ लाख ६८ हजार रुपयांपासून १७ लाख ८१ हजार रुपये एवढी आहे.

एक्झिक्युटिव्ह सेदान प्रकारातील गाड्यांमध्ये सर्वाधिक शक्तिशाली इंजिन आणि अत्याधुनिक सुविधांसह आकर्षक अंतर्गत आणि बाह्य रचना हे या गाडीचे वैशिष्ट्य असल्याचा कंपनीचा दावा आहे.

या गाडीला १६४ बीएचपी, ३८० एनएम टॉर्क असलेले २.० लीटर व्हीसीडीआय टर्बो इंजिन आहे. सहा ऑटोमॅटिक अथवा मॅन्युअल गिअर्सचे पर्याय या गाडीत उपलब्ध आहेत. ऑटोगिअरला १४. ८१; तर मॅन्युअल गिअर्सच्या मॉडेलची १७.९ किलोमीटर प्रति लीटर धावण्याची क्षमता आहे.

एलईडी डीआरएल, क्रोम हॉरिझॉंटल स्लॉट, प्रोजेक्टर फोग लँप, मे लिंक इन्फोटेन्मेंट यंत्रणा, रेअर व्हिजन कॅमेरा, माउंटेड ऑडीओ कंट्रोल असलेले बहुउद्देशी स्टीअरिंग या सुविधांसह पुढील सीट्सना दोन एअर बॅग, बाजूला दोन एअर बॅग्ज, इलेक्ट्रोनिक सेन्सर्स असलेले अँटी लॉक ब्रेकिंग सिस्टीम, इंमोबिलायझर, अँटी थेफ्ट अलार्म आणि स्वयंचलित लॉक सिस्टीम या सुरक्षा यंत्रणाही या गाडीत उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.

Leave a Comment