विक्रेत्यांना १ हजार कोटी रुपयांचे कर्ज देणार स्नॅपडील

snapdeal
नवी दिल्ली : चालू वर्षात आपल्या प्लॅटफॉर्मवर जास्तीत जास्त विक्रेत्यांना जोडण्याच्या तयारीत ई-कॉमर्स कंपनी स्नॅपडील असून कंपनी यासाठी पुढील सहा महिन्याच्या दरम्यान आपल्या विक्रेत्यांना १ हजार कोटी रुपयांच्या कर्जाचे वाटप करणार आहे. त्यामुळे अनेक व्यापारी जोडण्याशी आशा कंपनीला आहे.

स्नॅपडीलने कर्ज वाटपाची प्रक्रिया सुलभ आणि जलद होण्यासाठी पेपर काम म्हणजे आर्थिक स्टेटमेन्ट आणि कोलट्रल्स यांना दूर केले आहे. स्नॅपडील याच्या जागेवर इंडस्ट्रीमधील पहिले क्रेडिट रेटिंग इंजिन आणणार असल्यामुळे कर्ज देण्याची प्रक्रिया सुलभ होण्यास मदत होणार आहे.

लोकांच्या व्यवहाराचा इतिहास आणि ग्राहकांचा अभिप्राय यांचा वापर करून धोका आणि कर्ज परतपेढीची क्षमता यांची माहिती हे इंजिन डेटा अल्गोरिदम सांगते. याबाबत स्नॅपडीलच्या एका वरिष्ठ अधिका-याने दिलेल्या माहितीनुसार, आतापर्यंत त्यांच्या विक्रेत्यांकडून कोणतीही समस्या आलेली नाही. स्नॅपडीलचे क्रेडिट रेटिंग इंजिन युरोप आणि अमेरिकामध्ये वापरल्या जाणाऱया इंजिनसारखेच आहे. भारतामध्ये असे इंजिन पहिलेच आहे, जे व्यापाऱयांना रक्कम उपलब्ध करणार आहे. कंपनी ऑनलाईन विक्रेत्यांना कर्ज देण्यासाठी बँकांशी चर्चा करत आहे.