सॅमसंगच्या नफ्यात घट

samsung
सोल : तिस-या तिमाहीतील जगातील प्रमुख मोबाईल हँडसेट कंपनी सॅमसंग इलेक्ट्रॉनिक्सचा नफा वार्षिक आधारावर ४० टक्क्यांनी कमी झाला असून जागतिक स्तरावर स्मॉर्टफोन आणि मेमरी कार्ड यांची मागणी कमी झाल्याने त्याचा परिणाम कंपनीच्या आर्थिक परिणामांवर दिसून आला आहे.

कंपनीला ऑक्टोबर-डिसेंबर तिमाहीमध्ये निव्वळ नफा ३२२० अब्ज वोन (२.७ अब्ज डॉलर) राहिला आहे. हा नफा एका वर्षाच्या तुलनेत ३९.७ टक्क्यांनी कमी आहे. या दरम्यान कंपनीच्या नफ्यामध्ये १६.१ टक्के वाढ होऊन तो ६१०० अब्ज वोन राहिला आहे, असे कंपनीच्या अधिका-यांनी माहिती देताना म्हटले आहे. आयटी क्षेत्रातून मागणी कमी झाल्याने कंपनीला सध्या अनेक समस्यांचा सामना करावा लागत आहे.

Leave a Comment