वीज बिल पेटीएमवरून भरल्यास २०० रुपयांपर्यंत सवलत

paytm
नवी दिल्ली : मोबाईल कॉमर्स प्लॅटफॉर्म पेटीएमसह वीज वितरण कंपनी बीएसईएसने एक करार केला असून या करारा अंतर्गत बिल अदा करण्याच्या एक आठवडय़ापूर्वी जर बिलाची रक्कम भरली तर ग्राहकांना २०० रुपयापर्यंतची सवलत मिळणार आहे. ग्राहकांना २०० रुपयांपर्यंतचे पैसे पुन्हा देण्यात येणार आहेत.

ही योजना बिल जमा करण्यासह अन्य सर्व देकयांसाठी असून फेब्रुवारी ते मार्चपर्यंत ही योजना वैध असेल. सर्व ग्राहकांनी पेटीएमची वेबसाइट अथवा पेटीएम ऍपच्या माध्यमातून तारखेच्या आधी बिल भरणे गरजेचे आहे. तरच या योजनेचा लाभ मिळेल, असे बीएसईएसच्या अधिका-याने माहिती देताना म्हटले आहे. २०० रुपये पुन्हा मिळविण्यासाठी ग्राहकांनी ‘बीएसईएस२००’ या कूपन कोडचा वापर करावा. त्यानंतर बिल भरावे. तर १५०० रुपयांची रक्कम पुन्हा मिळवायची असेल तर ‘बीएसईएस१५०’ या कूपनवर क्लिक करून बिलाची रक्कम भरावी.

Leave a Comment