आयआरसीटीसीवर एका महिन्यात केवळ ६ वेळाच करता येणार बुकिंग

irctc
नवी दिल्ली- रेल्वेने नेहमी प्रवास करणाऱ्या प्रवाशांना आता प्रवास कधी करावा याचेच नव्हे तर तिकीट केव्हा बुक करावे याचे देखील नियोजन करावे लागणार आहे. कारण रेल्वेने तिकीट बुकिंगची मर्यादा एका महिन्यात १० हून सहावर आणल्यामुळे एका महिन्यात केवळ सहाच वेळा एका अकाउंटहून आयआरसीटीसीवर तिकीट बुक करता येणार आहे.

आयआरसीटीसीहून बुकिंग करणारे देशभरातील सुमारे ९० टक्के लोक हे बहुतेक करुन केवळ सहा वेळाच तिकीट बुक करतात. इतर १० टक्के लोक हे तिकीट एजंट्स असावेत याची शक्यता असल्यामुळेच त्यांच्यावर आळा घालण्यासाठी हे पाऊल उचलण्यात आले असल्याचे रेल्वे मंत्रालयाने सांगितले आहे.