ओप्पोचा एफ१ भारतात लॉन्च

oppo
मुंबई – चीनमधील स्मार्टफोन उत्पादक कंपनी ओप्पो ने आपला नवीन स्मार्टफोन एफ१ भारतीय बाजारात लॉन्च केला असून या मोबाइल फोनचे लॉन्चींग देशाची आर्थीक राजधानी मुंबईतील एका फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये करण्यात आले.

एफ१मध्ये ८ मेगापिक्सल फ्रंट फेसिंग कॅमेरा आहे तर १३ मेगापिक्सल रिअर कॅमेरा आहे. एफ१ शक्तिशाली सॉफ्टवेअर आणि हार्डवेअर वापरुन विशेषरित्या डिझाईन केलेला आहे. या फोनमध्ये ३ जीबी रॅम आणि १६ जीबी रॉम सोबत क्वालकॉम स्नॅजड्रॅगन ६१६ सिरीज ऑक्टाकोअर प्रोसेसर आहे. एफ१ गोल्डन आणि रोज गोल्ड या दोन रंगांमध्ये उपलब्ध आहे आणि ४जी सक्षम या फोनची किंमत १५,९९० रुपये आहे.

उत्कृष्ट फोटोग्राफीची आवड असणा-या भारतीय ग्राहकांसाठी ओप्पोने आणखी एक सुखद धक्का दिला असून एफ१चा एक हाय स्पेक प्रकार एफ१ प्लस. या फोनला ४ जीबी रॅम आणि अत्याधुनिक फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे. हा फोन एप्रिलमध्ये उपलब्ध होणार असुन याची किंमत २६,९९० रुपये असेल.

Leave a Comment