राजन भारताच्या विकास दर मोजण्याच्या पद्धतीबाबत साशंक

rajan
मुंबई- भारतीय रिजर्व्ह बॅंकेचे गव्हर्नर भारताच्या विकास दर मोजण्याच्या पद्धतीबाबत साशंक असल्याचे दिसत असून भारतात सध्या देशाचा विकासदर मोजण्यासाठी जी पद्धत वापरली जात आहे तिच्यावर त्यांनी प्रश्नचिन्ह इंदिरा गांधी विकास संशोधन संस्थेच्या पदवीदान समारंभात उभे केले आहे.

त्यांनी विकास दराची मोजमाप हा केवळ आकड्यांचा खेळ वाटायला नको त्यातून आपला खरा विकास किती झाला हे समजायला हवे असे मत मांडले. आपण विकास दर कसा मोजतो याबाबत सावध असले पाहिजे. कारण अनेकदा लोकांच्या स्थित्यंतरावरूनही विकास दर वाढल्याचे लक्षात येते. तेव्हा वाढ आणि निव्वळ वाढ याबाबतही आपण जागरुक राहायला हवे असे ते म्हणाले. केंद्रामध्ये नरेंद्र मोदींचे सरकार आल्यानंतर भारताने विकास दर मोजण्यासाठीचे आधारवर्ष बदलले त्यामुळे देशाचा विकास दर एका टक्क्यापेक्षा आधिक वाढल्याचा भास निर्माण झाला. राजन यांच्या बोलण्याचा रोख मोदी सरकारवर तर नाही ना असा प्रश्न त्यांच्या वक्तव्यामुळे अनेकांच्या मनात येत आहे.

Leave a Comment