हायटेक फिसर्चवाला ‘लावा’चा ‘पी७’ दाखल

lava
नवी दिल्ली : हायटेक फिसचर्ससह ‘पी७’ हा नवीन स्मार्टफोन भारताची स्मार्टफोन निर्माता कंपनी ‘लावा’ने बाजारात लाँच केला असून या फोनची किंमत ५,९९९ रूपये आहे.

‘लावा पी७’ची प्रमुख वैशिष्टय़े : याचा डिस्प्ले ५ इंचाचा असून कॉर्निंग गोरिल्ला ग्लास प्रोटेक्शन देण्यात आले आहे. यात अँड्रॉईड ५.१ लॉलीपॉप ऑपरेटींग सिस्टिम त्याचबरोबर १.२ गीगा हर्ट्ज् क्वॉडकोर मीडियाटेकचा प्रोसेसरही देण्यात आला आहे. यात १ जीबी रॅम, ८ जीबीची इंटरनल आणि ३२ जीबी एक्सपांडेबल स्टोअरेज क्षमता आणि एलईडी फ्लॅशसह ५ मेगापिक्सलचा रिअर, २ मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरादेखील देण्यात आला आहे. याच्या बॅटरीची क्षमता २००० एमएएच एवढी आहे. यात ३जी, वाय-फाय, ब्ल्यूटय़ूथ, जीपीएस अशा कनेक्टीव्हीटी देखील देण्यात आल्या आहेत.