३१ हजार रुपयांत बजाजची सीटी १०० बी बाईक

bajaj
मुंबई : भारतीय बाजारात स्वस्त बाईक सीटी १०० बी (CT 100B) पुणे स्थित ऑटो कंपनी बजाजने लाँच केली असून स्पोक व्हील ट्रीम सिटी १००च्या
तुलनेत बजाजची ही नवी बाईक चार हजार रुपयांनी स्वस्त आहे.

बजाजची सीटी १००बीची किंमत ३१ हजार (एक्स शोरूम, दिल्ली) इतकी आहे. आतापर्यंतची ही सर्वात स्वस्त बाईक आहे. या बाईकमध्ये काही बदल करण्यात आलेय मात्र इंजिनची क्षमता तितकीच ठेवण्यात आली आहे. यात सिंगल सिलेंडर, ४ स्ट्रोक, ९९.२७ सीसीचे इंजिन बसवण्यात आले आहे. ही बाईक प्रतिलीटर ९० किमी धावू शकते असा दावा कंपनीने केला आहे.

बजाजने काही दिवसांपूर्वीच सर्वाधिक विकली जाणारी १००सीसी कम्यूटर बाईकच्या किंमती कमी करण्याचा निर्णय घेतल्याचे वृत्त होते. बजाजच्या या सीटी १००बी ची टक्कर हीरो एचएफ डिलक्स, टीव्हीएस स्टार सिटी प्लस, होंडा ड्रीम निओ सांरख्या बाईकशी असणार आहे.

Leave a Comment