प्रदुषमुक्तीच्या दिशेने बॅटरीवर चालणा-या कायनेटीकची ‘सफर’

safar
नवी दिल्ली : बॅटरीवर चालणारी ‘कायनेटीक सफर’ ही तीनचाकी रिक्षा ‘कायनेटीक ग्रीन एनर्जी ऍन्ड पॉवर सोलुशन्स’ने भारतीय बाजारपेठेत लाँच केली असून या रिक्षाची दिल्लीत किंमत १ लाख ३८ हजार रूपये आहे.

कायनेटीकने सफरच्या माध्यमातून प्रदुषमुक्तीच्या दिशेने सकारात्मक पाऊल टाकले असून एकदा चार्जींग केल्यानंतर तब्बल ११५ किलोमीटरचे अंतर कापण्याची तसेच ताशी २५ किमी वेग धारण करण्याची या रिक्षाची क्षमता असल्याचा कंपनीचा दावा आहे. याशिवाय कायनेटीक सफरमधून एका चालकासह चार प्रवाशांना प्रवास करता येईल, असेही कंपनीकडून स्पष्ट करण्यात आले आहे. कायनेटीक सफरसाठी पुण्यातील कायनेटीक ग्रुपला ४०० कोटींची ऑर्डर मिळाली असून, उत्तर प्रदेश सरकारने २७ हजार कायनेटीक सफरची ऑर्डर केली आहे.

Leave a Comment