वर्ल्ड बँकेकडून प्रथमच प्राणीसंग्रहालयासाठी फंड

igzp
ज्या देशांच्या अर्थव्यवस्था ढासळत आहेत त्यांच्यासाठी स्थिरता देण्याचे काम करणार्‍या जागतिक बँकेने त्यांच्या इतिहासात प्रथमच भारताच्या विशाखापट्टणम इथल्या इंदिरा गांधी झुलॉजीकल पार्कसाठी फंड दिले असून या निमित्ताने बँकेच्या कार्यात नव्या अध्यायाची सुरवात केली आहे.

प्राणीसंग्रहालय ही एक प्रकारची जनावरांची बँकच असते. विशाखापट्टणमच्या या प्राणीसंग्रहालयाची हुदहुद चक्रीवादळात अपरमित हानी झाली आहे. इको डेव्हलपमेंटसाठी या संग्रहालयाला वर्ल्ड बँकेकडून २५०० कोटी रूपयांचे फंडस दिले जाणार असून ही मदत २०१५ ते २०२० अशा पाच वर्षात केली जाणार आहे. आंध्रप्रदेश डिझास्टर रिकव्हरी प्रोजेक्टसाठी दिल्या जात असलेल्या मदतीचाच हा एक हिस्सा आहे.

वर्ल्ड बँकेच्या कंट्री ऑफिसर व वरीष्ठ पर्यावरणतज्ञ नेहा व्यास म्हणाल्या, बँकेकडून प्रथमच अशा प्रकारची मदत दिली गेली आहे. हे संग्रहालय २५० हेक्टर परिसरात असून येथे १७० प्रजातीचे पशुपक्षी आढळतात. हे संग्रहालय आणि समुद्र यामध्ये फक्त १ रस्ता असल्याने हुदहुद चक्रीवादळात या प्राणीसंग्रहायाचे मोठे नुकसान झाले आहे.