जेनरेलीची डिझाईन वन लिमिटेड एडीशन कार

design-1
डब्ल्यू मोटर्ससाठी कार डिझाईन करणार्‍या व अँथनी जेनरेली नावाने त्यासाठी स्टार्टअप सुरू करणार्‍या कंपनीने जेनरेली डिझाईन वन ही कार डिझाईन केली असून या खूबसूरत कारची लिमिटेड एडिशन बाजारात आणली जाणार आहे. ही कार पुढील वर्षात बाजारात येईल व साधारण ३६ लाख रूपयांपर्यंत तिची किंमत असेल असे समजते.

६० च्या दशकात मोस्ट एक्सक्लूझिव्ह कारची निमिर्ती मोठ्या प्रमाणावर केली गेली आणि या निर्मितीची लोकांकडून खूप प्रशंसाही केली गेली होती. दुबई अशा कारचे माहेरघर म्हणून प्रसिद्धीस आले होते. लोकन हायपरस्पोर्ट व फेनिस सुपरस्पोर्ट या कंपन्यांनी गतवर्षी मिडील ईस्ट कार जगतात खळबळ माजविली होती. या कंपन्यातून बाहेर पडून स्टार्टअप सुरू केलेल्या अँथनी जेनरेलीने ६० च्या दशकातील सुपरकार मॉडेलवरून स्फूर्ती घेऊन डिझाईन वन तयार केली आहे. तिचा लूक विंटेज पोर्शच्या कॉन्कर्स डी एलिगन्ससारखा असला तरी या कारला मॉडर्न टचची जोडही दिली गेली आहे.

कारसाठी व्ही सिक्स इंजिन, सिक्स स्पीड मॅन्युअल ट्रान्समिशन गिअरसह दिले गेले असून कारचा वेग ताशी १३५ मैल इतका आहे. ही कार चार सेकंदात ० ते ६२ मैल ( १२० किमी) चा स्पीड घेऊ शकते. ही कार चालविणे अत्यंत सोपे आहे. तिच्यात हलक्या वजनाचे फायबर कंपोनंट,एलईडी लाईट दिले गेले आहेत.

Leave a Comment