दुबई फेस्टीव्हलमध्ये १५ कोटींचे गोल्ड प्लेटेड कार्पेट

carpet
दुबई मध्ये सध्या सुरू असलेल्या शॉपिंग फेस्टीव्हल मध्ये इराणच्या कारागिरांनी बनविलेले व सोन्याचा वापर केलेले एक खास कार्पेट आकर्षण बनून राहिले आहे. सात महिने आठ कारागिरांनी दररोज आठ तास काम करून बनविलेल्या या कार्पेटमध्ये १ किलो सोन्याचा वापर केला गेला असून या कार्पेटची किंमत आहे १४.५ कोटी रूपये. या महोत्सवात इराणबरोबरच भारत, पाकिस्तान, अफगाणिस्तान, चीन या देशांत बनलेली कार्पेटसही विक्रीसाठी असून त्यात भारताच्या जम्मू काश्मीर राज्यातील कार्पेटना चांगली मागणी आहे.

या महोत्सवात दुबईला भेट देणार्‍या भारतीय पर्यटकांची मोठी संख्या लक्षात घेऊन बॉलीवूड अभिनेत्री ऐश्वर्या राय हिच्या चेहर्‍यासारखे कार्पेटही मांडले गेले आहे व ते पाहायलाही मोठी गर्दी होत आहे. जम्मू काश्मीरच्या कार्पेटचे वैशिष्ठ म्हणजे ती सिल्कपासून बनविली जातात आणि रंगाला पक्की असतात. या कार्पेटसाठी जगभरातून मागणी असते. ही कार्पेटही महाग असतात. या फेस्टीव्हलमधील सर्वात महाग कार्पेट १५ लाख रूपये किमतीचे आहे. काश्मीरी कार्पेट बरोबरच आग्रा येथे बनलेली व मौल्यवान खडे आणि सोन्याचा वापर करून बनविलेली कार्पेटही ग्राहकांचे आकर्षण बनली आहेत. सरकारने कार्पेट बनविणार्‍या कंपन्यांना सबसिडी दिली तर भारतीय कार्पेट या व्यवसायात नंबर एकवर येतील असेही सांगितले जात आहे.

Leave a Comment