
नवी दिल्ली – अभिनेता सलमान खान याच्या ई-कॉमर्स खान मार्केट ऑनलाईन डॉट कॉमला दिल्लीच्या खान मार्केट असोसिएशनने दणका दिला आहे. याप्रकरणी असोसिएशनने सलमानला कायदेशीर नोटीस पाठवली आहे.
सलमानच्या खान मार्केटला कायदेशीर नोटीस
दरम्यान या असोसिएशनने सलमान खानला आपल्या या वेबसाईटवरून खान मार्केट हटवण्याचा सल्ला देखील देण्यात आला होता. पण सलमान आपल्या भूमिकेवर ठाम राहिल्यामुळे मार्केट असोसिएशनने कायदेशीर नोटीस पाठवली आहे. तरीसुद्धा सलमानने खान मार्केट हे नाव हटविले नाहीतर त्याच्यावर कायदेशीर कारवाई केली जाईल असे देखील असोसिएशनच्या वतीने सांगण्यात आले आहे. या नोटीस प्रकरणी अद्याप सलमानकडून कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही.
