आता स्मार्टफोनवरही लागू होणार सम-विषम सूत्र

mobile
नवी दिल्ली : प्रदूषणावर नियंत्रण मिळवण्यासाठी दिल्ली सरकारने सम-विषम सुत्राचा वापर सुरु केला असून दिल्ली युनिर्व्हसिटीच्या सेंट स्टीफन कॉलेजमध्येही या नियमाचा परिणाम पाहायला मिळाला.

एका संकेतस्थळाच्या माहितीनुसार दिल्लीच्या सेंट स्टीफन्स कॉलेज त्यांच्या विद्यार्थ्यांसाठी स्मार्टफोन वापरासाठीही सम-विषम सूत्र लागू करण्याच्या विचारात आहे. आरोग्यासाठी स्मार्टफोनचा अधिक वापर चांगला नसल्यामुळे हा निर्णय घेण्याबाबत कॉलेज विचाराधीन आहे. या योजनेनंतर विद्यार्थी रोज स्मार्टफोन आणू शकत नाहीत. याबाबत विद्यार्थ्याचे मत जाणून घेतले असता ७० टक्के विद्यार्थ्यांनी या योजनेस पाठिंबा दर्शवला.

Leave a Comment