सॉफ्टबँक भारतात करणार १० अब्ज डॉलरची गुंतवणूक

soft-bank
नवी दिल्ली – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्टार्टअप इंडिया योजनेच्या कार्यक्रमाला संबोधित करताना सॉफ्टबँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) मासायोशी सोन यांनी आगामी १० वर्षात १० अब्ज डॉलरची गुंतवणूक भारतात करणार असल्याची घोषणा केली आहे. दरम्यान आम्ही मागील वर्षात २ अब्ज डॉलरची गुंतवणूक केल्याचा उल्लेख करायला ते विसरले नाही. त्याचबरोबर त्यांनी भारतातील लोक खूप स्मार्ट आणि २१वे शतक त्यांचे आहे. त्यामुळे सॉफ्टबँक भारतात गुंतवणूक करणार आहे.

Leave a Comment