
मुंबई : सॅमसंगने दीड वर्षांपूर्वी गॅलेक्सी एस५ भारतात लॉन्च केला होता. त्यावेळी ५१ हजार ५०० रुपये एवढी या स्मार्टफोनची किंमत होती. मात्र फ्लिपकार्ट या ऑनलाईन शॉपिंग वेबसाईटवर आता हा स्मार्टफोन २१ हजार ९९९ रुपयांमध्ये उपलब्ध आहे.
सॅमसंग गॅलेक्सी एस५ वर बंपर डिस्काऊंट
हा स्मार्टफोन तुम्ही वेबसाईटवर जाऊन जेव्हा खरेदी करता, त्यावेळी तुम्हाला २१ हजार ९९९ रुपये मोजावे लागतील. मात्र, तुम्ही जर का फोन फ्लिपकार्टच्या अॅपवर खरेदी केल्यास तुम्हाला १८ टक्के सूट मिळणार आहे.
विशेष म्हणजे सॅमसंग गॅलेक्सी एस५ हा स्मार्टफोन डब्ल्यूएस रिटेलद्वारे विकला जात असल्यामुळे हा स्मार्टफोन ओरिजनल असणार हे नक्की. शिवाय, गॅरंटी आणि वॉरंटी मोबाईल सॅमसंगकडून दिली जाईलच. एका वर्षाची वॉरंटी या स्मार्टफोनला आहे.
