लेनोवोच्या के४ नोटसाठी मोठ्या प्रमाणात रजिस्ट्रेशन

lenovo
नवी दिल्ली : १९ जानेवारीपासून पाच जानेवारी रोजी लाँच झालेला लेनोवोच्या के ४ नोटची विक्री सुरु केली जाणार असून या स्मार्टफोनसाठी अॅमेझॉन इंडियावर मोठ्या प्रमाणात रजिस्ट्रेशन करण्यात आले आहे.

दोन लाख लोकांनी लाँच केल्यानंतर दोन दिवसांत या फोनसाठी रजिस्ट्रेशन केल्याची माहिती कंपनीने दिली आहे. कंपनीने या के४ नोट ची किंमत ११ हजार ९९९ रुपये इतकी ठेवली आहे.

के४ नोटमध्ये ५.५ इंचाचा एचडी स्क्रीनचा डिस्प्ले असून यात ३ जीबी रॅम असून मीडियाटेक प्रोसेसर आहे. या स्मार्टफोनचा रिअर कॅमेरा १३ मेगापिक्सेल आणि फ्रंट कॅमेरा ५ मेगापिक्सेलचा आहे. यात इंटरनल मेमरी १६ जीबीची देण्यात आली असून १२८ जीबीपर्यंत एक्सपांडेबल आहे. यात ४जी, एलटीई, ए-जीपीएस, ब्लूटूथ ४.० असे ऑप्शन देण्यात आलेत. यात ३३००mAh क्षमतेची बॅटरी देण्यात आली आहे.

Leave a Comment