कुठल्याही लॅपटॉपला आता बनवा ‘टचस्क्रीन’

airbar
मुंबई : तुमचा लॅपटॉप जर ‘टचस्क्रीन’ नसेल, तर त्याला पूर्ण लॅपटॉप बदलण्याची गरज नाही. कारण आता तुम्ही घरच्या घरी तुमच्या लॅपटॉपला ‘टचस्क्रीन’ बनवू शकता. स्विडनस्थित एका कंपनीने ‘एअरबार’ नावाचे एक डिव्हाईस तयार केले असून टचस्क्रीन नसलेल्या लॅपटॉपलाही या
डिव्हाईसद्वारे ‘टचस्क्रीन’ बनवू शकता. विशेष म्हणजे यासाठी लॅपटॉप बदलण्याची किंवा लॅपटॉपला सर्व्हिस सेंटरमध्ये घेऊन जाण्याचीही गरज नाही.

हे डिव्हाईस लॅपटॉपच्या यूएसबी पोर्टलला जोडून अगदी सोप्या पद्धतीने लॅपटॉपला टचस्क्रीन बनवू शकता. यूएसबी पोर्टलला कॉड जोडून त्यानंर हे डिव्हाईस लॅपटॉपच्या स्क्रीन खाली फिट करावी लागेल. त्यानंतर तुम्ही सर्वसाधारण लॅपटॉपही टचस्क्रीनने ऑपरेट करु शकता.

लॅपटॉपला हे डिव्हाईस कनेक्ट होताच एक इनव्हिजिबल लाईट्स स्क्रीनवर येण्यास सुरुवात होईल, ज्यामुळे युजर स्क्रीनटच आणि जेस्चर ओळखू शकतात. या सर्व प्रक्रियेसाठी कोणतेही नवे सॉफ्टवेअर इन्स्टॉल करण्याची गरज नाही. विशेष म्हणजे तुमच्या हातात हातमोजे असले तरीही तुम्ही स्क्रीनटचचा अनुभव घेऊ शकता.

अतिशय स्लिम असे हे डिव्हाईस असल्यामुळे लॅपटॉप स्क्रीनच्या खाली लावल्यानंतरही लक्षात येत नसल्यामुळे स्क्रीनवर कोणते डिव्हाईस लावले असल्याचेही वाटत नाही. मात्र, सध्या हे डिव्हाईस १५.६ इंच स्क्रीनच्या लॅपटॉपसाठीच काम करु शकणार आहे. सुमारे ३ हजार २४६ रुपये या डिव्हाईसची किंमत असून कंपनीच्या ऑफिशिअल वेबसाईटवर या डिव्हाईसची बुकिंग सुरु आहे.

हे डिव्हाईस काम करते यासाठी पहा हा व्हिडीओ

Leave a Comment