
मुंबई: आघाडीची मोबाईल उत्पादक कंपनी असलेलं अॅपलने आयफोन ५एसच्या किंमतीत कपात केल्यानंतर पुन्हा एकदा आपला फोन विकत घेऊ पाहणाऱ्या मोबाईलप्रेमींना आणखी एक खुशखबर दिली आहे. आता अॅपलने आयफोन ६एस आणि आयफोन ६एस प्लसच्या किमतीत मोठी कपात केली असून दोन महिन्यापूर्वीच हे दोन्ही फोन लाँच केले होते.
स्वस्त झाले ६एस आणि ६एस प्लस
मात्र या मोबाईल्सची मागणी दिवाळीनंतर घटल्यामुळे कंपनीने दोन्ही मोबाईलच्या किमती कमी केल्या आहेत. १६ जीबी हा आयफोन ६एस फोन भारतात १६ ऑक्टोबरला लाँच झाला तेव्हा त्याची किंमत ६२ हजार रुपये होती. मात्र कंपनीने आता हीच किंमत ५० हजार रुपयांवर आणली आहे. याव्यतिरिक्त ६४ जीबी आणि १२८ जीबी फोनच्या किमतीही उतरल्या आहेत. त्याच बरोबर आयफोन ६एस प्लसची किंमत ९२ हजार रुपये होती. यामध्येही दहा हजार रुपयांपर्यंत कपात करण्यात आली आहे.
