‘ह्युंदाई इंडिया’ची ‘इकोटी पुरस्कारा’ची हॅटट्रिक

creta
मुंबई: या आर्थिक वर्षात बाजारपेठेत पदार्पण केलेल्या एसयूव्ही कार्समध्ये सर्वाधिक मागणी असलेल्या कारला दिला जाणारा ‘इकोटी २०१६’ अर्थात ‘इंडियन कार ऑफ दि इयर’ पुरस्कार ‘ह्युंदाई क्रेटा’ने पटकावला आहे. ह्युंदाई इंडियाने सलग तीन वर्ष ‘इकोटी पुरस्कार’ मिळवून हॅटट्रिक साधली आहे. मागील ९ वर्षात चौथ्यांदा ‘ह्युंदाई’च्या कारने हा पुरस्कार मिळविला आहे.

मागील वर्षीचा पुरस्कार ‘एलाईट आय २०’ने; तर सन २०१४ मध्ये ‘ग्रँड आय १०’ने हा पुरस्कार पटकावला होता. सन २००८ मध्ये आय १० ला या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. या वर्षी सुरक्षिततेच्या आधुनिक सुविधा, ठळक अंतर्गत व बाह्य रचना, दमदार कामगिरी आणि उत्कृष्ट सुविधा यामुळे ‘ह्युंदाई क्रेटा’ला ‘इंडियन कार ऑफ दि इयर’ पुरस्कार देण्यात आला.

‘मेक इन इंडिया’ आणि ‘मेक फॉर फॉर द वर्ल्ड’ असे उत्पादन असलेल्या ‘ह्युंदाई क्रेटा’ या ‘परफेक्ट एसयूव्ही’ कारला वाहन उद्योगातील हा प्रतिष्ठेचा पुरस्कार मिळणे ही आमच्यासाठी सन्मानाची आणि अभिमानाची बाब आहे. हा पुरस्कार म्हणजे ग्राहकांच्या ‘ह्युंदाई’वरील विश्वासाचा द्योतक आहे; असे ‘ह्युंदाई इंडिया’चे कार्यकारी संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी वाय. के. कू यांनी पुरस्कार स्वीकारताना नमूद केले.

Leave a Comment