‘बीएसएनएल’च्या नव्या मोबाईल दरात ८० टक्के घट

BSNL
नवी दिल्ली: ‘बीएसएनएल’ने नवीन मोबाईल कनेक्शन घेणाऱ्या ग्राहकांसाठी कॉल दरात ८० टक्के कपात केली आहे. ही कपात सुरुवातीच्या दोन महिन्यांसाठी लागू असेल; अशी माहिती ‘बीएसएनएल’चे अध्यक्ष आणि मुख्य व्यवस्थापक अनुपम श्रीवास्तव यांनी दिली.

कंपनीने आपल्या पायाभूत सुविधा अद्ययावत केल्या असून यापुढे येणाऱ्या नव्या ग्राहकांना उत्तम सेवा देण्यासाठी ‘बीएसएनएल’ कटिबद्ध आहे; अशी ग्वाही श्रीवास्तव यांनी दिली.

प्रति मिनिट आणि प्रति सेकंद दर आकारणी होणाऱ्या दोन्ही बिलिंग प्लॅन्ससाठी दरांमधील कपात लागू असणार आहे. ‘बीएसएनएल’चे नवे कनेक्शन घेणाऱ्या ग्राहकांना प्रति सेकंद बिलिंग प्लॅनसाठी ३६ रुपयांचे आणि प्रति मिनिट बिलिंग प्लॅनसाठी ३७ रुपयांचे प्लॅन व्हाऊचर घेणे गरजेचे आहे.

Leave a Comment