
नवी दिल्ली : शाओमीचा नवा स्मार्टफोन एमआय ५ वर लॉन्चिंगआधीच मोबाईलप्रेमींमध्ये चर्चा सुरु झाली असून या स्मार्टफोनचे फीचर्स लीक झाले आहेत. शाओमी एमआय ५ बद्दल अनेक खुलासे गिझमोचीनने केले आहेत. २०१६च्या २१ जानेवारीला हा स्मार्टफोन लॉन्च होण्याची शक्यता असून यामध्ये फ्रंट फेसिंग फिंगर प्रिंट सेन्सर असणार आहे.
जानेवारीत लॉन्च होणार शाओमीचा एमआय ५
शाओमीच्या एमआय५ मध्ये सर्वात वेगवान स्नॅपड्रॅगन ८२० प्रोसेसर असणार आहे. शिवाय फोर्स स्क्रीन असण्याची शक्यताही वर्तवली जात आहे. गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये आणि त्यानंतर यंदा फेब्रुवारीत हा बहुप्रतीक्षित स्मार्टफोन लॉन्च होण्याची चर्चा होती. मात्र, अखेर २०१६ मध्ये लॉन्च होणार आहे.
