मार्कच्या लेकीचा पहिला वहिला फोटो व्हायरल

mark
न्यूयॉर्क : फेसबुक या सोशल मीडियाचा सर्वेसर्वा मार्क झुकरबर्गने आपल्या लेकीसोबतचा फोटो शेअर केला असून सोशल साईट्सवर सर्वांचे लक्ष एका सोफ्यावर पहुडलेला मार्क आणि त्याची मुलगी मॅक्स यांचा फोटो वेधून घेत आहे. मार्कने एका कमेंटमध्ये सर्व खुशाल असल्याची माहितीही दिली आहे.

mark1

मार्कने हा फोटो फुल ऑफ जॉय विथ लिटल मॅक्स असे कॅप्शन देऊन फेसबुकवर शेअर केला आहे. फोटो शेअर केल्यानंतर ६ तासांच्या आतच पोस्टला १५ लाखांहून जास्त लाईक्स, १० हजारांहून जास्त शेअर आणि ३५ हजारांच्या घरात कमेंट्स आल्या आहेत.

Leave a Comment