कधीही न झोपणारे ‘वेनिस’ शहर

venice-city
जगभरातील अनेक पर्यटनस्थळांचे आपले वेगळे वैशिष्टय़े असते. इटलीतील वेनिस या शहराने असेच वेगळेपण जपले आहे. वेनिसची जगात कधीही न झोपणारे शहर म्हणून वेगळी ओळख आहे.

या शहरात गेल्या सहाशे वर्षांपासून मोठा बदल झालेला नाही. पाण्यावर तंरगणा-या एकाद्या बेटाप्रमाणे असणारे हे अतिशय सुंदर व प्रसिद्ध शहर असून या शहराची निर्मिती जवळपास १२० छोटय़ा-छोटय़ा बेटांपासून करण्यात आली असून, शहरभर अनेक पूल आणि अंतर्गत कालवे आहेत. शहरात पायी चालत किंवा बोटींमधूनही फेरफटका मारता येतो.

युरोपातील सर्वात सुंदर शहर अशी ओळख असलेली वेनिस सिटी कधीही झोपत नाही. पर्यटकांची येथे २४ तास वर्दळ सुरू असते. जगभरातील पर्यटकांचे संपूर्णपणे पाण्यावर वसलेले हे शहर सर्वांत आवडते पर्यटनस्थळ आहे. तीन लाखांची लोकसंख्या असलेल्या या शहरात दररोज किमान ५० हजार पर्यटक भेट देत असतात.

Leave a Comment