
जपानी टेक कंपनीने दिलेल्या बातमीनुसार अॅपलचा आयफोन सेव्हन हा पूर्वीच्या फोनच्या तुलनेत जाडीला कमी असेल कारण तो हेडफोन जॅकशिवाय लाँच केला जाणार आहे. कंपनी यावर अधिक काम करत आहे. हेडफोन जॅक काढून टाकले तर फोनची जाडी 1 मिमिने कमी होणार आहे.
आयफोन सेव्हन असणार अधिक सडपातळ
आयफोनच या पूर्वीच्या सर्व फोनमध्ये हेडफोन पोर्ट दिले गेले आहे. मात्र नवीन आयफोन सेव्हनमध्ये हे पोर्ट लायटिंग पोर्टने रिप्लेस केले जाणार आहे. कंपनी नवीन लायटिंग कनेक्टरवर काम करत आहे. लायटिंग पोर्टबरोबर लायटिंग इक्विप्ड ईयरपॉडही कंपनी लाँच करणार आहे. हे ईयरपॉड सर्व आयफोन युजरना वापरता येतील. यापूर्वीही कंपनीने आयफोन फाईव्ह मध्ये लायटिंग कनेक्टर लाँच करण्याचा निर्णय घेतला होता मात्र त्याला चांगला प्रतिसाद मिळाला नव्हता.
