पुनरागमनानंतर दिल्लीत फेरारीचे शोरूम

ferrari
दिल्ली – फेरारीने त्यांचे भारतातील पहिले शोरूम दिल्लीतील मथुरा रोडवर सुरू केले असून सेलेक्ट कार्स प्रायव्हेट लिमिटेड हे त्यांचे डिलर आहेत. या शोरूमध्ये विक्रीपश्चात सेवाही दिली जाणार आहे. कंपनीतील वरीष्ठ अधिकर्‍यांच्या म्हणण्यानुसार दिल्लीत फेरारीचे अनेक ग्राहक आहेत. नवीन शोरूममुळे त्यांच्याशी संबंध अधिक दृढ होतीलच पण कस्टमर बेस वाढण्यासाठीही त्याचा उपयोग होईल. भारतातले हे कंपनीचे पहिले शोरूम असले तरी दुसरे शोरूम मुंबई लवकरच सुरू केले जाणार आहे.

2014 मध्येही फेरारीने मुंबईतील श्रेयांश ग्रुपशी सहकार्य करार करून शोरूम सुरू केले होते मात्र ग्राहकांच्या तक्रारी वाढत चालल्याने ही भागीदारी संपवून कंपनीने भारतातून गाशा गुंडाळला होता. मात्र आता सेल्स आणि सर्व्हीस सेवा विस्तार करण्याच्या उद्देशाने भारतात कंपनीने पुनगरागमन केले आहे. सेलेक्ट कार्सचे संचालक यदूर कपूर म्हणाले की त्यांच्या शोरूममध्ये मिडल इस्टमध्ये पेरारीसाठी काम करणारा व भारतात परतण्याची इच्छा असलेला तज्ञ स्टाफ हायर केला गेला आहे. तसेच कंपनीचे वरीष्ठ आणि अनुभवी मॅकॅनिक दुबई, इटली येथे ट्रेनिंग घेत आहेत.

Leave a Comment